Poornam EcoVision Foundation

Holistic approach towards sustainable lifestyle

Mega Drive on 28 August 2016

असे राबविण्यात येईल सामाजिक रक्षाबंधन महाअभियान

गुरूवार, १८ ऑगस्ट २०१६ म्हणजेच राखीपौर्णिमेपासून संघाचे स्वयंसेवक व विविध संस्था- संघटनांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्लास्टिक व ई कचऱ्याविषयी जनजागृती करणार आहेत. या महाअभियानाची सांगता रविवार, २८ ऑगस्ट २०१६ रोजी होईल. या अभियानात आपल्याकडील दोन्ही प्रकारातील कचरा (प्लास्टिक व ई कचरा) २८ ऑगस्ट २०१६ या एका दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळात या महाअभियानातंर्गत बनविण्यात आलेल्या संकलन केंद्रांवर नागरिकांनीच आणून द्यायचा आहे. शहरात ४४ केंद्र व ३०० हून अधिक उपकेंद्रावर हा कचरा एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर तो शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकप्रतिनिधी, ७० हून अधिक संस्था, संघटना व बँका या महाअभियानात सहभागी होणार आहेत. या दहा दिवसांच्या महाअभियानात सुमारे १५ हजारांहून अधिक संघ शाखा कार्यकर्ते, दीड लाखांहून अधिक विद्यार्थी सक्रियरित्या सहभागी होणार असून याव्दारे स्वयंसेवक व कार्यकर्ते पर्यावरण रक्षणाचा संदेश सुमारे ५ लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचविणार आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणार
या महाअभियानांतर्गत जमा होणाऱ्या कचऱ्याची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. यासाठी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. त्यात पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, महालक्ष्मी ई रिसायकलिंग, रूद्र इनव्हॉरमेंटल सोल्युशन, सागरमित्र, क्लीन गारबेज आदी संस्थांचा सहभाग असून या सर्व संस्थांनी भरघोस मदतीची तयारी दर्शविली आहे.

महाअभियानात सहभागी संस्था व संघटना
या महाअभियानात मार्केट यार्ड समिती, संगणक विक्रेते संघटना, फर्ग्युसन महाविद्यालयासह डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, गरवारे महाविद्यालयासह महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, स.प. महाविद्यालयासह शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयांसह महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालये, ज्ञानदा प्रशाला, सरस्वती मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, सिम्बॉयसिस महाविद्यालय, आर्थिक क्षेत्रातील जनता सहकारी बँक, जनसेवा बँक, उद्यम बँक, संपदा सहकारी बँक तसेच विश्व हिंदू परिषद, स्व-रूपवर्धिनी, भारतीय मजदूर संघ, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, निरामय प्रकल्प, सुराज्य सर्वांगिण विकास प्रकल्प, सेवा आरोग्य फाऊंडेशन, शिवसमर्थ प्रतिष्ठान यांसह इतर अनेक संघटनांचा सक्रियरित्या सहभाग असणार आहे. सहभाग असणार आहे.

Advertisements